उच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार

सामना प्रतिनिधी । कन्नड

कन्नड तालुक्यातल्या जैतापूर शिवारातील ज्ञानेश्वर झाल्टे यांच्या शेतात उच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या आणि 5 बकऱ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. चारा नसल्याने वैजापूर तालुक्यातील वाकला गावचे मेंढपाळ गावोगावी फिरून मेंढ्या चारतात. मात्र अचानक पडलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेचा शॉक लागल्याने मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळांचे मोठे नूकसान झाले आहे.

वाकला गावचे कडुबा सुखदेव आयनर यांच्या मालकीच्या 20 मेंढ्या, संजू मांगू शिनगाडे यांच्या 16 मेंढ्या, सदा देमा शिंदे यांच्या 18 मेंढ्या, महादू देमा शिंदे11 मेंढ्या व 2 बकऱ्या, अंबादास शिनगाडे यांच्या 6 मेंढ्या व बकऱ्या, बाळू शिनगाडे 6 मेंढ्या, 2 बकऱ्या अशा एकुण 77 मेंढ्या आणि 5 बकऱ्यां विजेचा शॉक लागल्याने ठार झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त बी.डी. राजपूत, तहसीलदार संजय वारकड यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी मंडळ अधिकारी दिनकर पाटील, तलाठी व्ही.ई. भिंगारे, पोलीस पाटील शिवाजी केवट यांनी घटनेचा पंचनामा केला असून, एवकूण 9 लाख 60 हजार रुपयांच्या आर्थिक नुकसानीची नोंद करण्यात आली. या प्रकरणी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना मेंढपाळांना शासकीय मदत करण्यासंदर्भात आदेश दिल्याची माहिती अनिल चव्हाण यांनी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या