७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसींना केंद्राची मंजुरी

8

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्र सरकारने ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसींअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांना मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाला.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) ५० टक्के करण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये घरभाडे भत्ता ३० टक्के, २० टक्के आणि १० टक्के असेल. भत्त्यांचे सुधारित दर १ जुलैपासून लागू होतील. घरभाडे भत्ता आणि अन्य भत्ता मिळणाऱ्या जवळपास ४७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

पेंशनर्सना दर महिन्याला १ हजार रुपयांचा मेडिकल अलाउंस देण्याचा महत्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला. वेतन आयोगाने यासाठी प्रति महिना ५०० रुपये देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. या निर्णयामुळे केंद्र सरकारवर ३० हजार ७४८ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या