ट्रेडिंगच्या नावाखाली केली फसवणूक 

ट्रेडिंगच्या नावाखाली व्यावसायिकाची 8 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार हे विलेपार्ले येथे राहत असून त्याचा व्यवसाय आहे. ते अनेकदा ऑनलाईन ट्रेडिंग आणि बँकिंगसाठी त्याच्या पह्नचा वापर करतात. गेल्या आठवडय़ात त्याना अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन ट्रेडिंगबाबत एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याने एक अॅप्स डाऊनलोड केले. त्याना ठगाने ट्रेडिंगचे फायदे सांगून गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्याने 8 लाख रुपयांची गुंतवणूक केली.

गुंतवणूक केल्यास काही तासांत नफा बँक खात्यात जमा होईल अशा भूलथापा मारल्या; मात्र गुंतवणुकीवर परतावा न मिळाल्याने त्याने त्या नंबरवर पह्न केला. मात्र काहीच प्रतिसाद त्याना मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.