मेघालयमध्ये 8 महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

475

मेघालयामध्ये अवघ्या 8 महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मेघालयच्या इंदिरा गांधी रुग्णालयात या बाळाचा मृत्यू झाला आहे.

इस्ट मोजो या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.  डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार 8 महिन्याचे बाळ आणि त्याचे पालक अरुणाचल प्रदेशचे रहिवासी आहेत. बाळाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला 400 कीमी दूर अरुणाचल प्रदेशच्या इंदिरा गांधी रुग्णालयात रेफर करण्या आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारदरम्यान या बाळाचा मृत्यू झाला आहे.

बाळाच्या मृत्यूमुळे राज्यातील कोरोना मृत्यूंची संख्या दोन वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 89 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यापैकी 43 रुग्ण बरे झाले असून 44 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या