8 महिन्यांच्या गर्भवतीला दाखल करून घेण्यास रुग्णालयांचा नकार, महिलेचा मृत्यू

741

कोरोनाच्या भीतीने अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्या घटना घडत आहेत. अशाच प्रकारे एका घटनेतील गर्भवतीला रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे घडलेल्या या घटनेत उपचारांअभावी महिलेचा तिच्या गर्भातील बाळासह रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गाझियाबाद येथे राहणाऱ्या या 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेला अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाला. तिला प्रथम इएसआय रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे नकार मिळाल्यने तिथून तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. तिथेही नकार मिळाल्याने तिला जीम्स रुग्णालयात नेण्यात आलं. जीम्स रुग्णालयाने एकही बेड रिक्त नसल्याचं सांगितल्याने तिचे नातेवाईक तिला फोर्टिस रुग्णालयात घेऊन गेले. तिथेही तिला दाखल करून घेण्यास नकार मिळाला.

तिथून तिला मॅक्स रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, इतका वेळ गेल्याने तिचा वाटेत मृत्यू झाला. या महिलेचं रूटीन चेकअप नोएडाच्या शिवालिक रुग्णालयात सुरू होतं. मात्र, तिथेच दाखल करून घ्यायला नकार मिळाल्याने महिलेवर अशी भटकायची वेळ आली. नकार देणाऱ्या रुग्णालयांमध्ये सरकारी आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयांचा समावेश आहे. राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटले असून योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनावर कडाडून टीका करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या