बुलढाणामध्ये 8 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

1314

बुलढाण्यातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांपैकी रविवारी रात्री उशिरा आणि सोमवारी सकाळी मिळालेल्या अहवालातील 8 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 4 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व पॉझिटिव्ह अहवाल खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथील आहे. यापूर्वी जळका भडंग येथील 25 वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आढळला होता. तरुणाच्या निकट संपर्कातील कुटुंबियांचा अहवाल पॉझिटिव आला आहे. जिल्ह्यात एकूण 45 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 26 कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 26 आहे. सध्या रूग्णालयात 16 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती खामगाव सामान्य रुग्णालयाकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या