गोव्यात ऑक्सिजन अभावी 8 रुग्णांचा मृत्यू, एकूण आकडा 83 वर

गोव्यात ऑक्सिजन अभावी आज 8 रुग्णांचा मृत्यू झाला. गोव्यात गेल्या काही दिवसांत ऑक्सिजन अभावी होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत अशा प्रकारे 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रात्री 2 ते सकाळी 6 दरम्यान ही दुर्घटना घडली. परंतु डॉक्टर्संनी हे वृत्त फेटाळले असून बहुतांश रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झालेल्या न्युमोनियामुळे झाल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे नर्स आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

रात्री 2 वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला. 13 वॉर्डमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नव्हता. वॉर्ड क्रमांक 149 मध्ये तब्बल दीड तास ऑक्सिजनचा पुरवठाच झाला नाही. ऑक्सिजन अभावी 8 रुग्णांचा मृत्यू झाला.

तर डॉक्टरांनी रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झालेल्या न्युमोनियामुळे झाल्याचे म्हटले आहे. न्युमोनियाच्या उपचारासाठी ऑक्सिजनची गरज असते. परंतु या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

गोव्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होणारी ही पहिली घटना नाही. आतापर्यंत ऑक्सिजन अभावी 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या