नगरमध्ये भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । राहुरी, नगर
नगरच्या राहुरीत स्कॉर्पिओला झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की स्कॉर्पिओ गाडीचा चकनाचूर झाला आहे. सर्व मृत व्यक्ती राहुरी येथील रहिवाशी होते.
नाथा डमाळे, महेश पवार, सुरेश खुळे, अरुण थोरात, सतीश शेळक, सतीश गोसावी, महेश कोळसे, सचीन ढगे अशी मृतांची नावे आहे. राहुरी कारखान्याहून नगरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असतांना एस्सार पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात नेत असतांना मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपली प्रतिक्रिया द्या