मालवणात मृत्यूची लाट, बेळगावच्या इंजिनीअरिंग कॉलेजमधील ८ जण बुडाले

33

सामना प्रतिनिधी । मालवण

मौजमजा करण्यासाठी मालवणात बेळगावहून आलेल्या इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर आज काळाने घाला घातला. वायरी येथील किनाऱ्यावर पोहण्यासाठी समुद्रात उतरलेले ११ जण भरतीमुळे समुद्रात वाहून गेले. त्यापैकी तिघांना वाचविण्यात यश आले असून या दुर्दैवी घटनेत आठ जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका प्राध्यापकासह सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
बेळगावमधील मराठा मंडळ इंजिनीअरिंग कॉलेजचे विद्यार्थी सहलीनिमित्त मालवण येथे आले होते. आज सकाळी अकराच्या सुमारास २१ ते २२ वयोगटातील हे विद्यार्थी वायरी येथील समुद्रात उतरले. समुद्रात मौजमजा करत असतानाच भरती आल्याने अचानक ही मुले समुद्रात ओढली जाऊ लागली. विद्यार्थी बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमारांनी समुद्राकडे धाव घेत या विद्यार्थ्यांना पाण्याबाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले; मात्र त्याअगोदरच आठजणांचा मृत्यू झाला होता. तर तिघांना वाचविण्यात यश आले असून ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मृतांची नावे
प्राध्यापक महेश कुचडकर (35)
मुजिबीन अनिकेत
नितीन बुतनाड
किरण खांडेकर
अवधूत तहसीलदार
माया कोल्हे
करुणा बेर्डे
आरती चव्हाण

आपली प्रतिक्रिया द्या