मध्य रेल्वेच्याही विसर्जनादिवशी आठ विशेष लोकल फेऱ्या

30
mumbai-local

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी गणेशभक्तांची गर्दी पाहून पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेही आठ विशेष लोकल फेऱया सोडणार आहे. ५ सप्टेंबर मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री या फेऱया चालविण्यात येणार असून मेन लाइनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण-ठाणे व हार्बरवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अशा एकूण आठ लोकल फेऱया चालविण्यात येणार आहेत.

मेन लाइनच्या विशेष फेऱया

  • सीएसएमटी (सुटणार रा. १.३०वा.) कल्याण (येणार रा. ३.००वा.)
  • सीएसएमटी (सुटणार रा.२.३०वा.) ठाणे (येणार रा.३.३०वा.)
  • कल्याण (सुटणार रा.१.००वा.) सीएसएमटी (येणार रा.२.३०वा.)
  • ठाणे (सुटणार रा.२.००वा.) सीएसएमटी (येणार रा.३.००वा.)

हार्बर लाइनच्या विशेष फेऱया

  • सीएसएमटी (सुटणार रा. १.३०वा.) पनवेल (येणार रा.२.५०वा.)
  • सीएसएमटी (सुटणार रा. २.४५वा.) पनवेल (येणार रा.४.०५वा.)
  • पनवेल (सुटणार रा. १.००वा.) सीएसएमटी (येणार रा.२.२०वा.)
  • पनवेल (सुटणार रा. १.४५वा.) सीएसएमटी (येणार रा.३.०५वा.)

परेच्या जलद लोकलना थांबा

गणेश विसर्जनाला होणारी गर्दी पाहून पश्चिम रेल्वेच्या अप दिशेच्या जलद लोकल  ५ सप्टेंबरच्या रात्री सायं.५.३० ते ८.३० दरम्यान मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान सर्व स्थानकांवर थांबा घेणार आहेत. मात्र, याचवेळात अप दिशेच्या धिम्या लोकलना मात्र चर्नीरोडच्या फलाट क्र.२ वर थांबा मिळणार नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या