24 तासांत 8 हजार 171 रुग्णांची वाढ, देशातला एकूण आकडा 1 लाख 98 हजारांवर

604

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे दररोज रुग्णांची भर पडताना दिसत आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या अहवालानुसार 24 तासांत 8 हजार 171 रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनामुळे 204 जणांचा मृत्यू ओढवला असून गेल्या चोवीस तासात 3709 रुग्ण बरे झाले आहेत.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनासंबंधीचा अहवाल जारी केला. त्यानुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 98 हजार 706 इतकी आहे. यापैकी 5 हजार 598 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे यातील 50 टक्के रुग्ण म्हणजेच 95 हजार 527 रुग्ण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत देशात 97 हजार 581 इतक्या अॅक्टिव्ह केसेस आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा आकडाही वाढत आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून 70 हजारांच्या आसपास हा आकडा आहे. यातील 30 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असून सद्यस्थितीत 37 हजार 543 रुग्ण बरे झाले असून 2 हजार 362 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो तमिळनाडू या राज्याचा. तमिळनाडूमध्ये 23 हजार रुग्ण असून त्यातील 184 जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यानंतर दिल्ली या राज्याचा क्रमांक असून येथे 20 हजार 834 रुग्ण आहेत, त्यातील 8746 रुग्ण बरे झाले असून 523 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुजरात या राज्यातील रुग्णांचा आकडा 17 हजार 200 इतका आहे. त्यातील 1063 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये एकूण 8980 रुग्ण असून त्यातील 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील एकूण रुग्णसंख्या 8283 इतकी असून त्यातील 358 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात रुग्णांचा आकडा 8075 इतका असून 217 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या