आठ वर्षाच्या मुलीवर 16 जणांचा सामुहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

3325
GANGRAPE IN BIHAR

तमिळनाडूमध्ये मानवतेला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. नातेवाईकांसह 16 जणांनी एका 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. यात पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे.

चेन्नई मधील एका 8 वर्षाच्या मुलीवर 2017 पासून काही नातेवाईक आणि इतर लोक बलात्कार करत होते. 2019 साली ही घटना समोर आली. गुरूवारी मुलीला पोटात त्रास झाला. खूप वेळ झाला तरी ती शौचालयातून बाहेर येत नव्हती. तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या