बुलढाण्यात 80 रुग्णांची वाढ; 42 रुग्ण कोरोनामुक्त

632

बुलढाण्यातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 387 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 307 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 80 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 72 व रॅपिड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 129 तर रॅपिड टेस्टमधील 178 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 307 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये मेहकर 4 महिला, 3 पुरूष, लोणी गवळी ता. मेहकर 6 पुरूष, 5 महिला, घाटबोरी ता. मेहकर 3 पुरूष, नांदुरा 1 पुरूष, 1 महिला, राम मंदीराजवळ 1 महिला, दबंगेपुरा 1 पुरूष, विदर्भ चौक 1 पुरूष, चिखली 1 पुरूष, सवणा ता. चिखली 9 पुरूष, 4 महिला, धाड ता. बुलढाणा 4 महिला, 2 पुरूष, बुलढाणा 1 पुरूष, 1 महिला, देऊळगावमही ता. देऊळगावराजा 2 महिला, खामगाव सती फैल 2 पुरूष, सुलतानपूरा 1 पुरूष, 1 महिला, देशमुख प्लॉट 2 मुली, 1 पुरूष, रेखा प्लॉट 3 महिला, 1 मुलगा, 1 पुरूष, बालाजी प्लॉट 2 पुरूष, 2 महिला, शेगाव रोड 1 पुरूष, शिवाजी नगर 1 पुरूष, 2 महिला, सिंधी कॉलनी 1 महिला, विनायक नगर 1 पुरूष, एकता नगर 1 महिला, माटरगाव ता. शेगाव 1 पुरूष, देऊळगावराजा शिवाजी नगर 2 महिला, 2 पुरूष, सिव्हील कॉलनी 1 महिला, बावनबीर ता. संग्रामपूर 1 महिला यांचा समावेश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 80 रूग्णांची भर पडली आहे.

जिल्ह्यात शनिवारी 42 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यात देऊळगावराजा 4 पुरूष, 2 महिला, शेगाव 7 पुरूष, 3 महिला, नांदुरा 1 पुरूष, जळगांव जामोद 6 महिला, बुलढाणा 4 महिला, 2 पुरूष, मलकापूर 1 पुरूष, चिखली 2 पुरूष, 1 महिला, खामगाव 2 महिला, 7 पुरूष यांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 9222 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 830 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या118 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात एकूण 1348 कोरोनाबाधित रूग्ण असून सध्या रूग्णालयात 488 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 30 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या