
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात पसरत असून आतापर्यंत 80 टक्के नागरिकांना त्याची लागण झाली आहे, अशी माहिती चीनच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्याने दिली आहे. दरम्यान, चीनमध्ये 13 ते 19 जानेवारीच्या दरम्यान रुग्णालयांमध्ये 13 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्या लोकांचा घरातच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा रुग्णांची आकडेवारी आरोग्य खात्याने अहवालात धरलेली नाही.
चिनी वर्षानिमित्त सुरू असलेल्या समारंभांमुळे लोक एकमेकांच्या संपर्कात जास्त येतील. त्यामुळे शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीतीदेखील आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.