पुण्याहून जम्मू-काश्मीरसाठी 80 जण रवाना – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

634

पुण्यात शिकणारे जम्मू-काश्मीरचे 65 विद्यार्थी आणि 15 नागरिक लॉकडाऊनमुळे अडकले होते. त्यांना घेऊन महामंडळाच्या तीन गाड्या नागपूरला रवाना झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. तेथून हे सर्व 80 जण जम्मू- काश्मीरला विशेष रेल्वेने जाणार आहेत.

लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी यांना त्यांच्या राज्यात अटी-शर्तींची पूर्तता करून जाऊ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी नीता शिंदे आणि समन्वय सहायक विवेक जाधव यांनी नियोजन केले. या नागरिकांकडून हमीपत्र भरून घेणे, आरोग्य तपासणी करणे याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात आली. तीनही बस रवाना करण्यापूर्वी प्रवाशांना फूड पॅकेट, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर या सर्व बाबींचा अवलंब करण्याच्या सर्व प्रवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या