‘ऑपरेशन ऑलआऊट’! ८० दहशतवाद्यांचा खात्मा, ११५ बाकी

10

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये हिंदुस्थानी लष्कराने दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन ऑलआऊट’चे यश आता समोर आले आहे. कश्मीरमध्ये गेल्या ६ महिन्यात ८० दहशतदवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. कश्मीरच्या दक्षिणेकडील भागामध्ये अजूनही ११५ दहशतवादी सक्रीय आहेत. यात जवळपास १०० दहशवादी स्थानिक असून १५ विदेशातून आलेले आहेत. या सर्वांचा लवकरच बंदोबस्त केला जाईल, असे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले.

गुरुवारी रात्री लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. चकमकीमध्ये २ जवान शहीद झाले. एका दहशतवाद्याला जवानांनी कंठस्नान घातले, तर दोन दहशतवादी फरार झाले. ठार केलेल्या दहशतवाद्याचे नाव बदर असे होते. तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे उघड झाले. कश्मीरमधील पंपोरजवळ असणाऱ्या सामबोरा गावामध्ये ही चकमक झाली.

आपली प्रतिक्रिया द्या