पुण्यात ८० वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार

32

सामना ऑनलाईन । पुणे

महाराष्ट्रातील पुण्यामध्ये एका ८० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील तळवडे येथे १३ जानेवारीला वृद्ध महिलेवर बलात्कार झाला. याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अल्पवयीन मुली, तरुणी, महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र आता या वासनांध लोकांपासून वृद्ध महिलाही सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आरोपींना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पुण्यात वृद्ध महिलेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या