रत्नागिरीत 24 तासात 82 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 2148 वर

436

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात आलेल्या अहवालांमध्ये 82 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2148 झाली आहे. शनिवारी 33 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1479 झाली आहे. शनिवारी डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 9, समाजकल्याणमधील 19, कामथे, चिपळूण 4 आणि कळबणी खेड येथील 1 रुग्ण आहे. घारेवाडी, चिपळूण येथील 58 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच 25 जुलै 2020 रोजी मृत्यु झालेल्या एका रुग्णाचा अहवाल उशीरा आल्याने त्याची नोंद शनिवारी करण्यात आल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या