82 वर्षाचा अभिनेता होणार बाबा, 29 वर्षांची गर्लफ्रेंड आहे गरोदर

प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता व दिग्दर्शक अल्फ्रेडो जेम्स उर्फ अल पचिनो हे वयाच्या 82 व्या वर्षी बाबा होणार आहेत. अल पॅसिनो यांची 29 वर्षांची गर्लफ्रेंड गरोदर असून येत्या दोन महिन्यात त्यांच्या घरी पाळणा हलणार आहे.

82 वर्षीय अल पचिनो यांचे त्यांच्या पेक्षा 53 वर्षांनी लहान नूर अल्लाह हिच्यासोबत प्रेमसंबंध सुरू आहेत. गेल्या वर्षी या दोघांना एकत्र डेटवर गेलेले पाहिल्यापासून मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. मात्र कोरोना काळाच्या आधीपासूनच या दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते. मात्र कोरोना काळात अल पचिनो घराबाहेहेर पडत नसल्याने त्याबाबत कुणालाही समजले नसल्याचे बोलले जात आहे. त्यांचे प्रेमसंबंध जगासमोर आल्यावर नूरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. अल पचिनो हे तिच्या वडिलांपेक्षा दुप्पट वयाचे असल्याने लोकांनी तिच्यावर टीका केलेली.

नूर ही सध्या आठ महिन्यांची गरोदर आहे. तिचे हे पहिलेच मूल असून अल पचिनो यांचे चौथे अपत्य असणार आहे. अल पॅसिनो यांची सर्वात मोठी मुलगी ही 33 वर्षांची असून त्यांना 22 वर्षांचे ट्विन्स आहेत.