‘या’ कारवर मिळत आहे 85 हजारांची सूट! 

2045

सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे. या उत्सवाच्या सीझनमध्ये अनेक कार उत्पादक कंपनी आपल्या कारवर मोठी सूट देतात. अधिकतर कंपन्यांनी आपल्या कारवार आतापासूनच सूट जाहीर केली आहे. वाहन क्षेत्र सध्या मंदीच्या वाईट काळातून जात आहे. त्यामुळे या सणांच्या हंगामातून वाहन क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. अशातच टाटा मोटर्सने आपल्या सर्व सुरक्षित कॉम्पॅक्ट ‘एसयूव्ही’वर मोठी सूट जाहीर केली आहे. चला याबद्दल घेऊ अधिक माहिती.

berry-red

कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Tata Nexon ही हिंदुथानातील सर्वात सुरक्षित गाडी आहे. ही गाडी लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी ही कार विकत घेतली आहे. हे पाहता टाटा मोटर्सने Tata Nexon वर चांगल्या ऑफर्स दिल्या आहेत. ग्राहकांना या कारवार 85,000 रुपयांची बचत करण्याची संधी मिळत आहे. यात  कॉर्पोरेट बोनस आणि एक्सचेंज ऑफरसह अनेक वेगवेगळ्या ऑफर देण्यात आल्या आहेत.

tata-nexon-side-profile

Tata Nexon ची एक्स-शोरूम किंमत 6.58 लाख रुपयेपासून सुरु होऊन 10.40 लाख रुपयांपर्यंत आहे. या एसयूव्ही मध्ये  1.2 लिटर  Turbocharged Revotron पेट्रोल आणि 1.2 लिटर  Turbocharged Revotron इंजिन देण्यात आले आहे. हे दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि स्वयंचलित ट्रान्समिशन पर्यायासह उपलब्ध आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या