मुंबईत 86 हजारांपेक्षा जास्त बोगस मतदार, निवडणुकीपूर्वी नावे वगळण्याची भाजपची मागणी

552

मुंबईतील मतदार यादीत 86 हजारांपेक्षा जास्त बोगस मतदारांचा समावेश आहे. त्याचबरोबर बांगलादेशी मतदारांची संख्याही मोठय़ा प्रमाणात असून निवडणुकीपूर्वी ही नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन केली.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी मुंबईत 86 हजारांपेक्षा जास्त मतदारांची नावे एकापेक्षा अधिक  मतदारसंघांत असल्याचे निदर्शनास आणून देत बोगस व दुबार नावे तत्काळ काढून टाकण्याची मागणी केली.

खर्‍या मतदाराद्वारेच आणि त्या क्षेत्रात प्रत्यक्षात असलेल्या नागरिकाद्वारेच आपला प्रतिनिधी निवडला जाणे हे निरोगी लोकशाहीसाठी आवश्यक आहे. पण मुंबईत मोठय़ा संख्येमध्ये खोटे मतदारही मत द्यायला तयार आहेत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांची नावे मतदार यादीमधून काढून टाकणे आवश्यक आहे. तसेच दिवाळी सुट्टीच्या आधी निवडणूक जाहीर करण्याची व युवा मतदारांनी मतदान करण्यासाठी विशेष अभियान राबवण्याची मागणीसुद्धा भाजप शिष्टमंडळाने केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या