बुलढाण्यात 88 नवे रुग्ण; 35 जणांची कोरोनावर मात

899

बुलढाण्यातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 527 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 439 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 88 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 57 व रॅपिड टेस्टमधील 31 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 116 तर रॅपिड टेस्टमधील 323 अहवालांचा समावेश आहे, अशाप्रकारे 439 अहवाल निगेटिव्ह आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलढाणा 1 पुरूष, सरस्वती नगर 1 महिला, 1 पुरूष, लांडे ले आऊट 1 पुरूष, बाजार समिती परिसर 1 महिला, 1 पुरूष, सुवर्ण नगर 1 पुरूष, संगम चौक परिसर 1 महिला, भीमनगर 1 पुरूष, जिजामाता नगर 1 पुरूष, दत्तपूर ता. बुलढाणा 1 पुरूष, चिखली 2 पुरूष, 1 महिला, जाफ्रबाद रोड 2 महिला, 1 पुरूष, सुलतानपूर ता. लोणार 1 महिला, मोताळा 1 पुरूष, 1 महिला, मलकापूर 1 महिला, भोगावती ता. चिखली 2 महिला, दाताळा ता. मलकापूर 2 पुरूष, 2 महिला, नांदुरा जामा मस्जिदजवळ 2 महिला, 1 पुरूष, विठ्ठल मंदीराजवळ 7 महिला, 1 पुरूष, मिलींद नगर 2 पुरूष, 1 महिला, डवंगेपुरा 1 पुरूष, राम मंदीराजवळ 2 महिला, 1 पुरूष, वसाडी बु ता. नांदुरा 1 महिला, खामगाव 2 पुरूष, डि.पी. रोड 1 महिला, सती फैल 5 महिला, आठवडी बाजार 2 पुरूष, वाडी 2 महिला, 1 पुरूष, शेगाव पोलीस स्टेशन 1 पुरूष, माटरगाव ता. शेगाव 5 पुरूष, 3 महिला, दे. राजा 1 महिला, 1 पुरूष, मस्जिदपुरा 1 पुरूष, अहिंसा नगर 1 पुरूष, बोराखेडी ता. दे. राजा 3 पुरूष, 4 महिला, साखरखेर्डा ता. सिं. राजा 3 पुरूष, लोणार 1 पुरूष, बावनबीर ता. संग्रामपूर 2 पुरूष, 1 महिला, खरबडी ता. मोताळा 1 पुरूष, 1 महिला यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सोमवारी 35 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे चिखली 1 महिला, राऊतवाडी 1 पुरूष, दे. राजा चांदेश्वरी मंदीराजवळ 1 महिला 1 पुरूष, शेगाव बालाजी फैल 3 पुरूष, 4 महिला, पहुरजिरा ता. शेगाव 1 महिला, साखरखेर्डा ता. सिं. राजा 1 महिला, अंचरवाडी ता. चिखली 5 पुरूष, 5 महिला, नांदुरा कृष्णा नगर 1 पुरूष, मारवाडी गल्ली 1 पुरूष, नांदुरा खुर्द 2 पुरूष, 1 महिला, चांदुर बिस्वा ता. नांदुरा 2 पुरूष, बेलाड ता. नांदुरा 1 महिला, खामगाव जुना धान्य बाजार परिसर 1 पुरूष, जळगाव जामोद चौबारा 1 पुरूष, जनुना ता. खामगाव 1 पुरूष, केशव नगर पुरूष यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 9968 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 887 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 82 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आतापर्यंत एकूण 1487 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 887 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 570 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 30 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या