चौथ्या टप्प्यात रिंगणात 89 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यात चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 320 उमेदवार रिंगणात असून त्यातील 109 उमेदवार कोटय़धीश आहेत, तर निवडणूक लढवणाऱ्या 89 उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवार, 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने उमेदवारांच्या आर्थिक, शैक्षणिक व प्रतिज्ञापत्राच्या आधारांवर विश्लेषण केले आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक रिंगणातील 34 टक्के उमेदवार आर्थिकदृष्टय़ा अतिशय सधन आहेत. समाजातील वंचित घटकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वंचित बहुजन

आघाडीचे व बहुजन समाज पक्षाचे सहा उमेदवार कोटय़धीश आहेत.
64 उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाच्या गुह्यांची नोंद आहे. दोन उमेदवारांच्या विरोधात गुन्हे सिद्ध झाले असून वंचित बहुजन आघाडीचे नाशिकचे उमेदवार पवन कुमार यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तीन उमेदवारांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे.

टॉपचे श्रीमंत उमेदवार
उमेदवार आणि संपत्ती
संजय सुशील भोसले (वंचित बहुजन आघाडी) 125 कोटी 6 लाख रु.
प्रिया दत्त (काँग्रेस) 96 कोटी 20 लाख रु.
मिलिंद देवरा (काँग्रेस) 79 कोटी 32 लाख रु.
उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) 68 कोटी 90 लाख रु.
समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) 65 कोटी 46 लाख रु.
सुभाष पासी (समाजवादी पक्ष) 64 कोटी 20 लाख रु.
इंजिनीअर नवीन बेताब (अपक्ष) 51 कोटी 2 लाख रु.
बाबाजी पाटील (राष्ट्रवादी) 42 कोटी 18 लाख रु
कुणाल पाटील (काँग्रेस) 42 कोटी 9 लाख रु.