89 वर्षीय आजीने नातवासोबत धरला गाण्यावर ठेका, व्हिडिओचा इंटरनेटवर धुमाकूळ

माणूस मनाने तरुण असला की त्याच्यासाठी वाढते वय हा केवळ आकडा असतो. सध्या सोशल मीडियावर एका 89 वर्षांच्या आजीबाईचा डान्स व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालतोय. ‘आय डोंट बिलिव्ह इन सोलमेंट्स’ या इंस्टाग्राम ट्रेंडमधील गाण्यावर आजी-नातवाच्या या जोडीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की, आजीबाई मजेशीर हावभाव करत देसी स्टाईलमध्ये डान्स करत आहेत. इतक्यात आजीला पाहून नातूही डान्स करू लागतो. आजी आणि नातवाच्या या डान्सने सोशल मीडियावर सगळ्यांची मनं जिंकली आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 60 हजारांहून अधिकांनी पाहिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या