नवरात्रीचे नवरंग

295

सामना ऑनलाईन, मुंबई

यावर्षी घटस्थापना -नवरात्रारंभ गुरुवार दि. २१ सप्टेंबर रोजी होत आहे. नवरात्रात नऊ दिवस वाराप्रमाणे नऊ रंगांची वस्त्रs नेसण्याची लोकप्रिय प्रथा आहे. यावर्षीचे नऊ रंग पुढीलप्रमाणे आहेत.

हे रंग वाराप्रमाणे ठरविले जातात. याच रंगाची वस्त्रs नेसलीच पाहिजेत असे धर्मशास्त्रात सांगितलेले नाही. या रंगाची वस्त्रs नेसल्यास भविष्य चांगले होते असेही नाही. या रंगाची वस्त्रs नेसली नाहीत तर पाप लागते असेही नाही.

परंतु नवरात्रात सर्व महिलांनी दररोज एकाच रंगाची वस्त्रs नेसली तर समानता दिसून येते. महिलांची एकता – एकजूट दिसून येते. मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. एकमेकींना मदत करण्याची इच्छा निर्माण होते. मनःस्वास्थ्य टिकण्यास मदत होते. नवरात्र हा स्त्राr शक्तीचा उत्सव असतो असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

  • गुरुवार, २१ सप्टेंबर –पिवळा
  • शुक्रवार, २२ सप्टेंबर –हिरवा
  • शनिवार, २३ सप्टेंबर-ग्रे / राखाडी
  • रविवार, २४ सप्टेंबर-केशरी
  • सोमवार, २५ सप्टेंबर- पांढरा
  • मंगळवार, २६ सप्टेंबर- लाल
  • बुधवार, २७ सप्टेंबर- निळा
  • गुरुवार, २८ सप्टेंबर- गुलाबी
  • शुक्रवार, २९ सप्टेंबर- जांभळा
आपली प्रतिक्रिया द्या