Breaking news – छत्तीसगडमध्ये दंतेवाडा-बिजापूर सीमेवर चकमक; 9 नक्षलवाद्यांना कंठस्नान

छत्तीसगडच्या दंतेवाडा-बिजापूर सिमाभागामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत सुरक्षा दलाने 9 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांच्या मृतदेहाजवळ एलएसआर, 303 आणि 12 बोरचे शस्त्र सापडली आहेत. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बस्तर डिव्हीजनमध्ये नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे संयुक्त पथक शोधमोहिमेवर निघाले. 3 सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास सुरक्षा दलाच्या जवानांचा सामना नक्षलवाद्यांशी झाला. यानंतर जोरदार धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूने तुफान गोळीबार सुरू झाला. जवानांनी आतापर्यंत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.