रत्नागिरी जिल्ह्यात आणखी नऊ रूग्ण सापडले; कोरोनाबाधितांची संख्या 343 वर

311

रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी आणखी नऊ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 343 इतकी झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृतांची संख्याही वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या दोघांचे तपासणी अहवाल शुक्रवारी आले असून ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13 झाली आहे. आतापर्यंत 125 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्या 198 आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या इतर 6 रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या