ऍमेझॉनचा  9 हजार कर्मचाऱ्यांना नारळ

जगभरात मंदीचे संकट घोंघावू लागले असून काही प्रमुख पंपन्यांमध्ये नोकरकपातीचे पेव फुटलेले असतानाच आता अॅमेझॉनही त्यांच्या 9 हजार कर्मचाऱयांना नारळ देणार असल्याचे समोर आले आहे.

अॅमेझॉनचे सीईओ अँडी जेसी यांनी सांगितलं की, गेल्या काही वर्षांमध्ये पंपनीमध्ये पुरेशी नोकरभरती करण्यात आली होती. मात्र आता जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची शक्यता लक्षात घेता नोकरकपात केली जाणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता दिसत असल्याने कर्मचारी कपातीशिवाय पंपनीकडे कोणताही पर्याय उरला नाही. या आधी फेसबुकच्या मालकीच्या मेटा पंपनीने त्याच्या 10 हजार कर्मचाऱयांना घरचा रस्ता दाखवला असून आता अॅमेझॉनही त्याच मार्गावरून चालल्याचे दिसत आहे.