नऊ वर्षाच्या चिमुरडीने पिकवला महाकाय कोबी,कमावले सत्तर हजार रुपये

61

सामना ऑनलाईन। पेसलवेनिया

अमेरिकेतील पेसलवेनिया येथे एका नऊ वर्षाच्या चिमुरडीने महाकाय कोबी पिकवून विक्रम केला आहे. लिली रीस असे तिचे नाव असून तिने पिकवलेल्या कोबीला सत्तर हजार रुपयाचे बक्षिस देण्यात आले आहे. लिलीने नॅशनल बोनी प्लांटस कार्यक्रमात कोबी पिकवण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

लिली पिट्सबर्ग येथील पीबल एलिमेंट्री शाळेत चौथीत शिकते. तिने केलेला हा चमत्कार बघून तिचे शिक्षक व पालकही आश्चर्यचकीत झाले आहेत. लिलीने पिकवलेला हा कोबी दिवसेंदिवस मोठा होत आहे. हा कोबी पिकवताना आपण काहीही वेगळं केलं नाही असे लिलीने म्हटले आहे. कोबीच्या झाडांना नियमित पाणी व सूर्यप्रकाश मिळाल्यामुळेच तो एवढा मोठा झाल्याचे लिलीने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या