पुण्याच्या 9 वर्षीय अद्वैतने सर केले माऊंट किलीमंजारो

454

वयाच्या सहाव्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्पचे शिखर सर करणारा अद्वैत हा सर्वात कमी वयाच्या गिर्यारोहकांपैकी एक हिंदुस्थानी ठरला होता. आता वयाच्या नवव्या वर्षी माऊंट किलीमंजारो सर करून अद्वैतने आपल्या कामगिरीत अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. अद्वैतने आपली आई पायल भारतीय आणि या मोहिमेचे लीडर समीर पथम यांच्या नेतृत्वाखाली मचामे मार्गाने ट्रेक सुरू केला आणि 31 जुलै रोजी तब्बल 18 हजार 652 फूट उंच वसलेल्या माऊंट किलीमंजारोच्या अतिउच्च शिखरावर पोहोचला.अगदी कमी हवेचा दाब, कमी ऑक्सिजन पुरवठा आणि 21 ते उणे 25 डिग्री सेल्सिअस सब झीरो तापमान अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले. या परिस्थितीचा सामना करण्याकरिता अद्वैतला दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या