संभाजीनगरमध्ये आणखी 90 रुग्णांची वाढ; 686 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

524

संभाजीनगर जिल्ह्यात शनिवारी सकाळी 90 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1936 झाली आहे. त्यापैकी 1154 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 96 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 686 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये पिंपळगाव देवशी, गंगापूर (1), भवानी नगर (2), राधास्वामी कॉलनी (1), भारतमाता नगर, एन 12 (1), हर्सुल परिसर (1), गारखेडा परिसर (3), मिल कॉर्नर (2), अहिंसा नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), आकाशवाणी परिसर (1), न्याय नगर (1), कैलास नगर (1), आंबेडकर नगर (2), एन 11 टी.व्ही सेंटर (2), एन आठ, सिडको (2), रोशन गेट (5), बीड बायपास रोड (1), हुसेन कॉलनी (3), हनुमान नगर (1), गादिया विहार, शंभू नगर (1), तोफखाना, छावणी (1), पीर बाजार उस्मानपुरा (3), भीमनगर, भावसिंगपुरा (2), जुनी मुकुंदवाडी (1),संजय नगर (2), पद्मपुरा (1),समता नगर (1), युनुस कॉलनी (1), जुना बाजार (1), जय भीम नगर (1), गौतम नगर (1), नॅशनल कॉलनी (2), लेबर कॉलनी (3), देवडी बाजार (1), वेदांत नगर (1), बुद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), अल्तमश कॉलनी (1), पैठण गेट (1), रेहमानिया कॉलनी (1), पिसादेवी रोड (1), हर्सूल जेल (29)अन्य (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 21 महिला आणि 69 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

घाटीमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
चंपा चौकातील 50 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा शुक्रवारी दुपारी 3.15 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 75, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 20, मिनी घाटीमध्ये 1 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 96 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या