90 वर्षाच्या आईला घरात बंद करून फिरायला गेला मुलगा, भुकेने झाली होती अर्धमेली

1108

उत्तर प्रदेशमधील अलीगढ शहरात एका व्यक्तीने त्याच्या 90 वर्षाच्या आईला घरात बंद करून ठेवून तो कुटुंबासोबत 10 दिवसांच्या टूरवर गेला होता. आईला भेटायला आलेल्या त्या महिलेच्या मुलीने तिची सुटका केली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

जलालुद्दीन असे त्या क्रूर मुलाचे नाव असून तो त्याची पत्नी व दोन मुलींसोबत बाहेरगावी फिरायला गेला होता. त्यावेळी त्याने त्याच्या आईला घरात बंद करून ठेवले होते. जागेवरून हलणेही मुश्कील असलेल्या त्या बिचाऱ्या महिलेला खाण्यासाठीही घरात काही ठेवले नव्हते. काही दिवस पाण्यावर काढल्यानंतर ती घरातलं पीठ वगैरे खाऊ लागली होती.

दहा दिवस झाले तरी आपल्या आईची काहीच खबर मिळत नाही म्हणून महिलेच्या मुलीला तिची काळजी वाटू लागली. ती लागलीच शुक्रवारी माहेरी आली. मात्र घराला टाळे होते. तिने शेजारी चौकशी केली असता घरातील जलालुद्दीन मुली व पत्नीसोबत फिरायला गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्याच्यासोबत त्याची आई दिसली नाही असेही त्यांनी मुलीला सांगितले. त्यामुळे मुलीला आईची काळजी वाटू लागल्याने तिने शेजारच्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी तिची आई घाणीत झोपलेली होती. सदर महिला स्वयंपाकघरात बसलेली होती. त्या जिथे बसल्या होत्या तिथेच त्य़ांनी प्रात:विधीही उरकल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण घरात दुर्गंधी पसरली होती. त्या अर्धमेल्या अवस्थेत असल्याने त्यांच्या मुलीने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिने जलिलुद्दीन त्यांची पत्नी अतिका अंजुम व मुलीं सायमा व सना यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने आपल्या आईच्या दननीय अवस्थेचे व्हिडीओही काढले असून ते पोलिसांना पाठवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या