90 वर्षांची मॅनेजर म्हणते, सेवानिवृत्ती इतक्यात नकोच!

वयाच्या 90 व्या वर्षी जपानमधील एका कंपनीत मॅनेजर असलेल्या यासुको तमाकी या महिलेने जागतिक विक्रम केला आहे. सर्वाधिक वयाची ऑफिस मॅनेजर म्हणून त्यांच्या नावाची नोंद गिनिज बुकात झाली आहे.

यासुको तमाकी यांचा जन्म 15 मे 1930 रोजी झाला. त्या एका ट्रेडिंग कंपनीत 1956 सालापासून काम करत आहेत. आजही त्या सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत आठवडय़ाचे पाच दिवस काम करतात.

या वयात सगळं कसं जमतं यावर यासुको सांगतात, माझा जन्म इतरांच्या मदतीसाठी आहे. माझ्या ऑफिसमधील संचालक, मॅनेजर आणि सहकाऱयांना मी खूश ठेवायचा प्रयत्न करते. हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. सेवानिवृत्तीबद्दल त्या म्हणतात, सेवानिवृत्ती इतक्यात नकोच. एक वर्ष गेल्यावर दुसरं येतं. आयुष्याचं प्रत्येक वर्ष असंच कामात व्यतित करायचं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या