रत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले

49
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक शाळेतील सुमारे नऊशे शिक्षकांचा जून महिन्याचा पगार अद्याप झालेला नाही. पगार रखडल्यामुळे शिक्षक चिंतेत सापडले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य आठ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार तीन जुलै रोजीचे झाले आहेत.रत्नागिरी तालुक्यातील नऊशेहून अधिक शिक्षकांचे जुलैचा पंधरवडा संपला तरी पगार झालेले नाहीत. बदली झालेल्या शिक्षकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. तालुकास्तरावरून पगाराच्या बिलात चुका झाल्यामुळे हा विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षक रत्नागिरी पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या