Photo – हिंदुस्थानी हवाई दलाचा 90 वा वर्धापन दिन

हिंदुस्थानी हवाई दल दिवस म्हणून 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. या दिवशी हवाई दलाच्या ताकदिचे प्रात्यक्षिक दाखविले जाते, यासाठी विशेष तयारी करण्यात येते. यंदा हा कार्यक्रम चंदिगढ, सुखनी तलाव येथे पार पडला. त्याची काही छायाचित्रे.

हिंदुस्थानी हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिश सहायक हवाई दल म्हणून करण्यात आली होती. नभ:स्पृशं दीप्तम्। हे हिंदुस्थानी हवाई दलाचे ब्रीदवाक्य आहे. विशेष म्हणजे हे वाक्य गीतेतल्या अकराव्या अध्यायातून माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सुचविले होते. याचा अर्थ आकाशाला गौरवाने व अभिमानाने स्पर्श करणे असा होतो.