१० महानगरपालिकांसाठी ९,१९९ उमेदवार निवडणूक रिंगणात

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्यातील १० महानगरपालिकांच्या १ हजार २६८ जागांसाठी तब्बल ९ हजार १९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या १५ जिल्हा परिषदेच्या ८५५ जागांसाठी ४ हजार २७८ तर १६५ पंचायत समित्यांच्या एकूण १ हजार ७१२ जागांसाठी ७ हजार ६९३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

राज्यातील १० महानगरपालिकांसाठी २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारी २०१७ रोजी १५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १६५ पंचायत समित्यांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात ११ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या ११८ पंचायत समित्यांसाठी २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचा दोन्ही टप्प्यात समावेश असून पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील ८; तर दुसऱ्या टप्प्यात ४ पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभागांचा समावेश आहे. मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी २३ फेब्रुवारी २०१७ रोजी होईल.

काही उमेदवार एकापेक्षा जास्त नामनिर्देशनपत्रे दाखल करतात; परंतु एखाद्याने कितीही नामनिर्देशनपत्रे दाखल केली असली तरी अंतिमत: प्रत्येकाचा एकच उमेदवारी अर्ज गृहीत धरला जातो. त्यामुळे नामनिर्देशनपत्रांच्या माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. ही मुदत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी १३ फेब्रुवारी २०१७; तर अपील असलेल्या ठिकाणी १५ फेब्रुवारी २०१७ पर्यंत असेल.

महानगरपालिकानिहाय उमेदवारांची संख्या

बृहन्मुंबई २२७ जागा- २२७१ उमेदवार

ठाणे १३१ जागा-११३४ उमेदवार

उल्हासनगर ७८ जागा- ८२१ उमेदवार

नाशिक १२२ जागा- १०८९ उमेदवार

पुणे १६२ जागा- ६२३ उमेदवार

पिंपरी-चिंचवड १२८ जागा -८०४ उमेदवार

सोलापूर जागा १०२-४७८ उमेदवार

अकोला जागा ८०-५७९ उमेदवार

अमरावती जागा ८७-६२६ उमेदवार

नागपूर जागा १५१- ७७४ उमेदवार

 

पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदनिहाय उमेदवारांची संख्या

अहमदनगर ७२ जागा -३०३ उमेदवार

औरंगाबाद ६२ जागा-३२३ उमेदवार

बीड ६० जागा- ४४० उमेदवार

बुलडाणा ६० जागा-३३३ उमेदवार

चंद्रपूर ५६ जागा-३१४ उमेदवार

गडचिरोली ३५ जागा-१७६ उमेदवार

हिंगोली ५२ जागा २४५ उमेदवार

जळगांव ६७ जागा-२४४ उमेदवार

जालना ५६ जागा-२६६ उमेदवार

लातूर ५८ जागा-२३१ उमेदवार

नांदेड ६३ जागा -३७४ उमेदवार

उस्मानाबाद ५५ जागा – २५४

परभणी ५४ जागा-२७६ उमेदवार

वर्धा ५० जागा-२९३ उमेदवार

यवतमाळ ५५ जागा-३०६ उमेदवार

आपली प्रतिक्रिया द्या