‘या’ 92 वर्षाच्या व्यक्तीचे केस आहेत 5 मीटर लांब, 80 वर्षात एकदाही नाही धुतले

2136

व्हिएतनाम येथे राहणाऱ्या एका 92 वर्षीय व्यक्तीचे केस तब्बल 5 मीटर लांब आहे. ग्युयेन वान चिएन असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याने आयुष्यात एकदाही केसाला कात्री लावलेली नाही. तसेत चिएन यांना असे वाटते की जर त्यांनी केस कापले तर त्यांचा मृत्यू होईल. म्हणून त्यांनी आतापर्यंत एकदाही केस कापलेले नाहीत.

चिएन हे व्हिएतनाम मधील हो चि मिन्ह सिटी या गावात त्यांच्या 62 वर्षीय मुलासोबत राहतात. ‘मी केस कापायची कधी हिंमतच केली नाही. ना कधी ते धुतले किंवा विंचरले. गेल्या 80 वर्षात मी एकदाही केसांना पाणी लावलेले नाही किंवा फणीने विंचरलेले नाही. मी फक्त त्यांची निगा राखायचा प्रयत्न करतो. बाहेर पडतो तेव्हा माझे केस कायम स्कार्फने बांधलेले असतात. ते चांगले दिसतील यावरही मी लक्षं देतो’, असे चिएन सांगतात.

‘मी तिसरी पर्यंत शिकलोय. त्यावेळी एकदा शाळेत शिक्षकाने माझे केस कापायला लावले होते. पण त्यानंतर मी कधी केस कापलेच नाही. जेव्हा मला कळलं ती त्या दैवी शक्तीने मला निवडले आहे त्यानंतर तर मी कशी केस कापले नाहीत. आता माझे केस अगदी कडक झाले आहेत. खरंतर ते आता डोक्याचाच भाग बनत चालले आहेत.’, असे चिएन सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या