93 वर्षांच्या आजीची कमाल, विमानाच्या छतावरुन केली आसमंताची भ्रमंती

सोशल मीडियावर सध्या एका व्हीडीओची जोरदार चर्चा सुरु आहे. एका 93 वर्षांच्या आजाबाईंचा व्हिडीओ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये ही आजी उडत्या प्लेनमध्ये उभी राहीलेली दिसत आहे. जो कोणी हा व्हिडीओ पाहत आहे तो थक्क होत आहे. हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला असून तो हजारोवेळा पाहण्यात आला आहे.

बेट्टी ब्रोमेज असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. हा कारनामा करण्याची पहिलीच वेळ नाही तर, याआधीही बेट्टी ब्रोमेज हिने चार वेळा असा कारनामा केला आहे. लंडनमध्ये राहणारी ब्रोमेजने नुकतेच हाय फ्लाईंग चॅलेंजच्या माध्यमातून विंग वॉकरच्या मदतीने पाचवे उड्डाण पूर्ण केला. त्यांच्या या व्हिडीओचा BBC Gloucestershire ने फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. जिथे हा व्हिडीओ हजारो वेळा पाहण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बेट्टी ब्रोमेजने उडत्या प्लेनवर उभे राहून दाखवले. विमान हवेशी बोलत होते. हवेत डुबकी मारताना काही मिनिटांत विमान उतरते. ब्रोमेजने जोरदार वाऱ्याच्या मध्यभागी स्वतःला धरून ठेवले. मात्र, यावेळी त्यांनी सर्व सुरक्षा प्रोटोकॉल पाळले होते.

व्हिडीओमध्ये बेट्टी ब्रोमेज शानदार अनुभव असल्याचे बोलणे ऐकू येत आहे. ब्रोमेज बोलते, मी याचा आनंद घेतेय. हा भरपूर रोमांचक आणि वेगळा अनुभव आहे. फ्लाइटचे पायलट ब्रायन कॉन्र्स सांगतात की, मला माहित नाही कोण जास्त घाबरले होते. मी की ब्रोमेज? वास्तविक ब्रोमेज एक अद्भुत महिला आहे. ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार, सर्व शारीरिक अडचणी असतानाही ब्रोमेजने धर्मादाय संस्थेसाठी निधी उभारण्यासाठी हे काम केले.