दिलासादायक! 95 वर्षीय आजी झाली कोरोनामुक्त

1218

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. एकट्या इटलीत पाच हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या व्हायरसमुळे 60 वर्षाहून अधिक वय असलेल्या वृद्धांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असतानाच इटलीतील एका 95 वर्षीय आजीने कोरोनाविरोधातील लढा जिंकला आहे. ही आजी कोरोनामुक्त झाली आहे.

अल्मा क्लारा कोरसिनी असे त्या आजीचे नाव असून त्यांना 5 5मार्च ला पाऊलो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजीचे टेस्ट पॉझिटीव्ह आले होते. मात्र सुरुवातीपासून आजींनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. अखेर वीस दिवसांच्या उपचारानंतर आजी कोरोनामुक्त झाल्या आहेत. आता लवकरच त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येणार आहे.

याआधी इराणमधील एका 103 वर्षांच्या आजीबाई कोरोनामुक्त झाल्या होत्या. इराणमधील सेमनान या गावात त्या राहतात. त्या पूर्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या