पाकिस्तानातील विमान दुर्घटनेत 97 जणांचा मृत्यू

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे A320 हे लाहोर वरून कराचीला जाणारे विमान जीन्नाह आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड होत असताना कोसळले. या दुर्घटनेत 97 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण चमत्कारिकरित्या बचावले आहेत. हे विमान एका मोठी लोकसंख्या असलेल्या भागात कोसळले असून अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र इमारतीतील रहिवाशांबाबत अद्याप समजलेले नाही.

पाकिस्तानमध्येही कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र 25 मे रोजी ईद निमित्त गेल्या आठवड्यात पाकिस्तानने विमानसेवा सुरू केली होती. ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या या विमानाने कराची विमानतळावर लँड करण्याचा तीन वेळा प्रयत्न केला. मात्र विमान यशस्वीरित्या लँड करू शकले नाही. आणि चौथ्या प्रयत्नात विमान कोसळले.’ अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या