सुपर नानी ! तरुण उमेदवारांना हरवत 97 वर्षाच्या आजी झाल्या गावच्या सरपंच

751
vidya-devi-sikar

राजस्थानच्या सीकरमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीची सध्या देशभर जबरदस्त चर्चा रंगली आहे. या निवडणूकीत सरपंचपदसाठी निवडणूक लढलेल्या 97 व्या वर्षांच्या आजी विजयी झाल्या आहेत. विद्या देवी असे त्या आजींचे नाव असून त्यांनी निवडणूकीपूर्वी घरोघरी जाऊन प्रचार देखील केला आहे.

विद्या देवी यांची थेट लढत विद्यमान महिला सरपंच सुमन देवी यांच्याशी होती. याशिवाय झनकोरी देवी, विमला देवी आणि आरती मीणा या अन्य तीन महिला देखील निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. या सर्वांना धोबीपछाड देत विद्या देवी यांनी निवडणूकीत बाजी मारली आहे. विद्या देवी या 207 मतांनी जिंकल्या आहेत.

55 वर्षांपूर्वी विद्या देवी यांचे पती मेजर शिवराम सिंह देखील गावचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले होते. इतकेच नाही तर त्यांचे सासरे सुभेदार सेडूराम यांनी देखील 20 वर्ष गावाचे सरपंच पद भूषवले होते. विद्या देवी यांचा नातू मोंटू सीकर येथील वॉर्ड क्र. 25 मधून जिल्हा परिषदेवर निवडून गेला आहे. सासरे आणि पतीने गावाचा विकास केला. तसेच योगदान आपल्याला द्यायचे असल्याचे विद्या देवी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या