इंग्लंड लायन्सच्या तिघांची शतके

करुण नायरच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर हिंदुस्थान ‘अ’ संघाने 557 धावांचा डोंगर उभारल्यानंतर इंग्लंड लायन्स संघानेही चोख प्रत्युत्तर देत तिसऱया दिवसअखेर 7 बाद 527 अशी मजल मारली. त्यांच्या टॉम हेन्स (171), मॅक्स होल्डन (101) आणि डॅन मुस्ली (113) या तिघांच्या शतकामुळे लायन्सला ही जबरदस्त धावसंख्या उभारता आली. हिंदुस्थानच्या मुकेश कुमारने 75 धावांत 3 विकेट टिपले.