
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. पण मुळात निवडणुका प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने पार पडलेली नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.
X वर पोस्ट करत विजय वडेट्टीवार म्हणाले की, “बिहार निवडणुकीआधी एसआयआर झाले, मतदार यादीत अनेक घोळ होते. बिहार मध्ये युतीचे सरकार इतके लोकप्रिय होते तर महिलांच्या खातात १० हजार देण्याची योजना का आणली? रेवडी देतात, निवडणुक यादीत घोळ केले तर, ९० टक्के निकाल त्यांच्या बाजूने येणारच. हे निकाल लोकशाहीला धोका पोहचवणे आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “निवडणुकीत जय आणि पराजय होत असतो,आम्ही ते स्वीकारतो. पण देशात निवडणुका जर पारदर्शक पद्धतीने होणार नसतील तर भविष्यात लोकशाही टिकणार का, हा प्रश्न आहे.”


























































