
रायगड पोलीस दलातील विविध विभागात व पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक अशा एकूण 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी हा बदल्यांचा आदेश काढला आहे. त्यात तीन महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असून एकाच पोलीस ठाण्यात दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांची खोपोली पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.दिघी सागरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांची बदली अलिबाग पोलीस ठाण्यात केली आहे. गोरेगावमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांची बदली माणगाव पोलीस ठाणे येथे केली आहे. माथेरानचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांची बदली कर्जत पोलीस ठाण्यात केली आहे.अलिबाग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता मुसळे यांची माथेरानमध्ये प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
खालापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांची दिघी सागरी पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून बदली केली आहे. माणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेल दार यांची गोरेगाव पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून बदली केली आहे. अलिबागचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांची कोलाड येथे प्रभारी अधिकारी म्हणून बदली केली आहे.जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांची रसायनी येथे बदली केली आहे. भरोसा सेलमधील पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांची जिल्हा वाहतूक शाखेत बदली केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांची भरोसा सेल अलिबागमध्ये प्रभारी अधिकारी म्हणून बदली केली आहे.





























































