
‘इंडिया’च्या बैठकीत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीचा जोरदार पुरस्कार केला. भाजपविरुद्ध सुरू असलेला विरोधी पक्षांचा लढा हा देश आणि संविधानाच्या हितासाठी आहे. तो एकत्रितपणे लढण्याची गरज आहे. त्यासाठी अंतर्गत राजकारण टाळून पुढे जायला हवे,’ असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
सुमारे 15 मिनिटांच्या भाषणात त्यांनी अनेक मुद्दे मांडले. मतचोरीचा मुद्दा काँग्रेसने जोरकसपणे लावून धरला आहे. घटक पक्षांचीही या मुद्दय़ावर साथ मिळायला हवी अशी अपेक्षा राहुल यांनी व्यक्त केली. घटक पक्षांनी एकमेकांवर टीका करणे टाळले पाहिजे, असेही ते म्हणाले. मागील लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी भाजपला दिलेल्या कडव्या लढतीचा दाखलाही राहुल यांनी यावेळी दिला. भाजपचा पराभव करणे कठीण नाही, मात्र त्यासाठी एकजूट भक्कम हवी. आपसात वाद घालून स्वतःला कमकुवत करणे टाळले पाहिजे, असेही ते म्हणाले.




























































