गोरगरीबांच्या ‘उज्ज्वला’मध्ये आता मिळणार फक्त चार सिलिंडर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरगरीबांसाठी राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोदी सरकारने मोठा झटका दिला आहे. या योजनेतील अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची संख्या 9 वरून थेट 4 वर आणण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेत एका सिलिंडरमागे 300 रुपयांचे अनुदान देण्यात येते. योजना सुरू झाली त्यावेळी या योजनेंतर्गत 12 अनुदानित सिलिंडर देण्यात येत होते.