युवासेना घडवतेय ‘सडेतोड’ भावी वक्ते, वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद; शेकडो स्पर्धकांचा सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सडेतोड’ भावी वक्ते घडवण्यासाठी युवासेनेच्या वतीने खास मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त डोंबिवलीत झालेल्या या स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपल्या वक्तृत्वाची झलक दाखवली.

तरुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे व त्यातून उत्कृष्ट वक्ते तयार होण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. गांधीनगर येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, युवासेना जनसंपर्क कार्यालयात ही स्पर्धा पार पडली. जिल्ह्याच्या विविध भागांतून स्पर्धक आले होते. 18 ते 35 या वयोगटासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. प्रथम पारितोषिक प्रभाग संते यांनी पटकावले. द्वितीय क्रमांक विश्वास दसगुडे तर तृतीय पारितोषिक अनुज मोरे यांनी प्राप्त केले. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

जिल्हा युवाधिकारी प्रतीक पाटील, कल्याण लोकसभा सचिव सुधीर पाटील, युवती सेना विस्तारक (कल्याण लोकसभा) प्रियांका साळगावकर, विधानसभा अधिकारी आदित्य पाटील, उपविधानसभा अधिकारी ऋतुनील पावसकर, शहरप्रमुख सुरेश परदेशी, शहर संघटक प्रियांका विचारे, उपशहरप्रमुख राहुल चौधरी, उपशहर संघटक वंदना बेलेकर, लक्ष्मी कांबळी, निशा रेडीस, सुरेखा सावंत, शहर सचिव मंदार गुरव, साहिल पाटील, पायल शिंगोटे, ज्योती पाखरे, विभागप्रमुख शंकर राऊळ, सखाराम वांद्रे, मंगेश मोरे, शाखाप्रमुख संजय मांजरेकर, अभय दिघे, बबन जगताप, मोहन माळी, शाखा संघटक अंजली शिंदे, उपशाखा संघटक नंदा भिसे व लक्ष्मी काळे, उपशहर अधिकारी सूर्यदर्शन जोशी, विभाग अधिकारी विजयानंद अय्यंगार, सचिन पाटील, वरुण चौहान, आर्यन विजय तोडीलकर, शाखा अधिकारी रजत पाटील, विपुल घोलप, आनंद तांबेकर, मनीष वालकुडे, अनंत गोटे, यश कदम, अक्षय म्हात्रे, संजय नारकर, सौरभ गुजर, राजू पवार, श्रुती गुरव, हर्षल नाईक आदी उपस्थित होते.