Jammu Kashmir News – अमरनाथ यात्रेच्या ड्युटीवर चाललेल्या बीएसएफच्या बसला अपघात, दोन जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरनाथ यात्रेच्या ड्युटीवर चाललेल्या बीएसएफच्या बसला मंगळवारी अपघात झाला. या अपघातात दोन जवान जखमी झाले आहेत. अमरनाथ यात्रेच्या ड्युटीसाठी जम्मूहून अनंतनागला बाएसएफ जवानांना घेऊन जात असताना रामबन जिल्ह्यातील पीरा परिसरात हा अपघात घडला.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, बीएसएफची बस आधी मारुती एर्टिगा गाडीला आणि नंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकली. या अपघातात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले. जखमींमध्ये हिमाचल प्रदेशचे हेड कॉन्स्टेबल अरवीन कुमार आणि बिहारचे एएसआय संजीत कुमार यांचा समावेश आहे. दोन्ही जवानांना तातडीने रामबन येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि मदत पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याचे काम सुरू झाले आहे.