Video : बिहारमध्ये पूर, ड्रमची बोट बनवून केली नववधूची पाठवणी

35

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारला गेल्या काही दिवसांपासून पावसाने झोडपले असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या बिहारमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात नववधूची चक्क प्लास्टिकच्या ड्रमच्या बोटीतून पाठवणी केली जात असल्याचे दिसत आहे.

फासबिसगंजमधील पिपरा गावात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पूर आला असून प्रवासाची सर्व साधने बंद झाली आहेत. नदीचे पाणी रस्त्यावर आले आहे. अशातच या गावातील एका तरुणीचे लग्न पार पडल्यानंतर तिची पाठवणी करण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी प्लास्टिकच्या ड्रम्सचा एक तराफा (बोट) तयार केला व त्यावर बसून नवरा व नवरीची पाठवणी केली. गावातील काही तरुणांनी त्या बोटीला धक्का मारत नदी पार करून गावच्या मुलीला तिच्या सासरी पाठवले. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या