Video- पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे कारला जलसमाधी

सामना ऑनलाईन । वसई

वसईत खवळलेल्या समुद्रकिनाऱ्यावर कार घेऊन नेणे पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. या अतिउत्साही पर्यटकांची कार समुद्राच्या लाटांमध्ये अडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वसईतील नवापूर समुद्रकिनाऱ्यावर खवळलेला समुद्र असताना या पर्यटकांने त्यांची इर्टीगा कार थेट समुद्राच्या पाण्यात घुसवली. मात्र समुद्राच्या लाटांचा जोर वाढल्याने कार समुद्रात अडकली. कार बाहेर काढण्यासाठी ट्रॅकरची मदत घेतली मात्र, त्यालाही अपयश आले. समुद्राच्या लाटांमध्ये कार बूडाताना दिसत होती.

आपली प्रतिक्रिया द्या